गुजरातमध्ये पाचशेच्या जुन्या नोटा आढळल्या ड्रेनजमध्ये

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

सुरत (गुजरात)- शहरातील रत्नसागर सोसायटीजवळ असलेल्या ड्रेनजमध्ये अज्ञात व्यक्तीने पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा टाकल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (शुक्रवार) दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील वरछा भागात महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांकडून साफसफाईचे काम सुरू होते. यावेळी रत्नसागर सोसायटीजवळ असलेल्या ड्रेनजमध्ये पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. या नोटा मळालेल्या अवस्थेत असून, अनेक नोटा फाडण्यात आल्या आहेत. दहा हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आल्या आहेत. संबंधित नोटा ताब्यात घेण्यात आल्या असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. देशातील विविध भागांमध्ये पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा कचरापेटी अथवा विविध ठिकाणी टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे.

Web Title: Gujrat: old 500 rupee note found in drain