अमित शहांच्या अंदाजाला 28 टक्के जीएसटी!

वृत्तसंस्था
सोमवार, 18 डिसेंबर 2017

एका अज्ञात व्यक्तीने ट्विट करताना म्हटले आहे, की अमित शहांचा अंदाज 150 होता. त्यावर 28 टक्के जीएसटी लागल्याने 42 जागा कमी झाल्या आणि गुजराती नागरिकांनी भाजपला जीएसटी लावून 108 जागा हाती दिल्या. ​

अहमदाबाद - गुजरात निवडणुकीत भाजप 150 जागा जिंकणार, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. प्रत्यक्षात भाजपची शंभरी गाठताना दमछाक झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे, शहा यांच्या दाव्याची सोशल मीडीयावरून खिल्ली उडविण्यात येत आहे. जीएसटीवरून लक्ष्य झालेल्या भाजपला '28 टक्के जीएसटी लागल्याने 42 जागा कमी होऊन 108 जागा मिळाल्या,' अशी टीप्पणी सोशल मीडीयात व्हायरल झाली आहे.

गुजरातमध्ये प्रचाराला सुरवात होण्यापूर्वीपासून अमित शहा यांनी भाजपला 150 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. भाजपच्या प्रमुख नेत्यांकडूनही भाजपचा मोठा विजय होईल, असे अंदाज वर्तविण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात भाजप 110 जागांच्या आतच जागा जिंकेल, असे चित्र आहे. त्यामुळे भाजपला सोशल मीडीयावरून लक्ष्य करण्यात येत आहे.

एका अज्ञात व्यक्तीने ट्विट करताना म्हटले आहे, की अमित शहांचा अंदाज 150 होता. त्यावर 28 टक्के जीएसटी लागल्याने 42 जागा कमी झाल्या आणि गुजराती नागरिकांनी भाजपला जीएसटी लावून 108 जागा हाती दिल्या. 

Web Title: Gujrat Verdict Gujrat Elections BJP Amit Shah on GST