देशात रुजला भाजप; काँग्रेस उरली 4 राज्यांपुरती...

सोमवार, 18 डिसेंबर 2017

भाजपने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा नारा दिल्यानंतर एकापाठोपाठ एक विजय मिळविण्यास सुरवात केली. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपकडे 7 राज्यांची सत्ता होती. आता ही संख्या वाढून 19 झाली आहे. तर, काँग्रेसकडे 13 राज्ये होती आता ती संख्या अवघ्या 4 वर आली आहे.

नवी दिल्ली - गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपने सत्ता स्थापन केल्याने देशात आता काँग्रेस फक्त चार राज्यांतच राहिली आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता होती, त्याठिकाणी सत्ता बदल झाला. तर, गुजरातमध्ये भाजपने सत्ता कायम राखली आहे.

भाजपने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा नारा दिल्यानंतर एकापाठोपाठ एक विजय मिळविण्यास सुरवात केली. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपकडे 7 राज्यांची सत्ता होती. आता ही संख्या वाढून 19 झाली आहे. तर, काँग्रेसकडे 13 राज्ये होती आता ती संख्या अवघ्या 4 वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. 

लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाटेत भाजपचे 282 खासदार निवडून आले होते. भाजपने अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्षांशी आघाडी करून सत्ता मिळविलेली आहे. यामध्ये प्रमुख्याने जम्मू काश्मीर, बिहार, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि केरळमध्ये डाव्या पक्षांचे सरकार आहे. कर्नाटक, पंजाब, मेघालय आणि मिझोराममध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पुढील वर्षी मेघालय, नागालँड, त्रिपूरा, कर्नाटक, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवून काँग्रेसची वाढ करण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापुढे आहे.

Web Title: Gujrat verdict Gujrat Elections BJP splashed across 19 states in India, Congress loss