मोबाईलवर आलेली 'ती' लिंक क्लिक करणं पडलं महागात!

मोबाईलवर आलेली 'ती' लिंक क्लिक करणं पडलं महागात!

नवी दिल्ली : हरियानातील गुडगाव येथे एका व्यावसायिकाला मोबाईलवर आलेली लिंक ओपन करणं चांगलेच महागात पडले. या व्यावसायिकाला त्याच्या मोबाईलवर अॅप इन्स्टॉल करण्याबाबत एक लिंक आली होती. त्याने त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक अॅप आपोआप इन्स्टॉल झाले. त्यानंतर त्याच्या खात्यातील 60 हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले.

हरिश चंदर असे 52 वर्षीय व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या मोबाईलवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने लिंक पाठविल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याने त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर लगेचच ते अॅप आपोआप इन्टॉल झाले. याबाबतची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून यातील आरोपींविरोधात भारतीय दंडविधान कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घडली. मात्र, आज याबाबत तक्रार देण्यात आली, अशी माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद आझाद यांनी दिली.
 
याबाबत चंदर याने सांगितले, की ''रात्री अडीचच्या सुमारास माझ्या मोबाईलवर ओटीपी आला होता. त्यानंतर हा ओटीपी आपोआप दुसऱ्या क्रमांकावर पाठविला गेला. याबाबतची तक्रार देण्यासाठी मी बँकेत गेलो. तेव्हा बँक प्रशासनाने मला माझा मोबाईल हॅक झाल्याचे सांगितले''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com