मोटारीला धक्का दिल्याने दुचाकीचालक डॉक्‍टरची हत्या

वृत्तसंस्था
रविवार, 21 मे 2017

येथील फारूख नगर परिसरात दुचाकीचालक डॉक्‍टरने एका मोटारीला धक्का दिल्याने संतप्त झालेल्या मोटारचालकाच्या भावाने घटनास्थळी येऊन डॉक्‍टरची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गुरुग्राम (हरियाना) : येथील फारूख नगर परिसरात दुचाकीचालक डॉक्‍टरने एका मोटारीला धक्का दिल्याने संतप्त झालेल्या मोटारचालकाच्या भावाने घटनास्थळी येऊन डॉक्‍टरची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

महावीर यादव नावाचे डॉक्‍टर आपल्या दुचाकीने शनिवारी सायबर सिटी परिसराच्या दिशेने निघाले होता. रस्त्यात आलेल्या होंडा सिटीला त्याच्या दुचाकीचा किरकोळ धक्का लागला. या छोट्याशा धक्‍क्‍यानंतर डॉक्‍टर आणि विकास नावाच्या मोटारचालकामध्ये वाद झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या विकासने रवी नावाच्या त्याच्या भावाला घटनास्थळी बोलावले. रवीने चार गोळ्या घालून पिस्तूल आणले आणि यादव यांच्या डोक्‍यावर, मानेवर आणि छातीवर तीन गोळ्या झाडल्या. त्यामध्ये घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये विकासलाही एक गोळी लागली. या सर्व प्रकारानंतर रवीने विकासला रुग्णालयात दाखल केले आणि रवी फरार झाला.

एका प्लॉटच्या खरेदीच्या निमित्ताने शनिवारी सकाळी यादव हे बालाजी कॉलनी येथून त्यांच्या एका नातेवाईकासोबत मोहम्मदपूरच्या दिशेने दुचाकीवर निघाले होते. त्यावेळी शनिवारी सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडला. पोलिस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Gurugram road rage: Doctor shot dead