राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मान्य: देवेगौडा

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जुलै 2018

संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नसतानाच माजी पंतप्रधान आणि जनता दल (एस) चे नेते एच. डी. देवेगौडा यांनी मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. 'राहुल गांधी हे आम्हाला आगामी पंतप्रधान म्हणून मान्य आहेत,' असे देवेगौडा यांनी जाहीर केले आहे.

बंगळूरू : संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नसतानाच माजी पंतप्रधान आणि जनता दल (एस) चे नेते एच. डी. देवेगौडा यांनी मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. 'राहुल गांधी हे आम्हाला आगामी पंतप्रधान म्हणून मान्य आहेत,' असे देवेगौडा यांनी जाहीर केले आहे.

आम्ही आता कर्नाटकमध्ये काँग्रेससोबत सरकार चालवत आहोत, त्यामुळे आम्हाला केंद्रात काँग्रेससोबत सरकार चालवण्यासाठी कुठलीच अडचण नाही. त्याचबरोबर, राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान झाले तरी चालतील असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले आहे.

काँग्रेसची काल (रविवारी) दिल्लीत बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. त्यापाठोपाठ आज जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी राहुल यांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा दिला. त्यामुळे एक प्रकारे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर डोळा ठेवून असलेले पुरोगामी लोकशाही आघाडीतील घटक पक्ष आता काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. जेडीएसने पंतप्रधानपदाबाबतची भूमिका स्पष्ट केली असली तरी इतर घटक पक्षांनी अजून आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नेमके चित्र स्पष्ट झाल्यावरच त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे काही राजकीय पक्षांचे मत आहे.

Web Title: h d deve gowda says his party has no hesitation in accepting congress president rahul gandhi as the prime minister