कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी विराजमान

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी आज (बुधवार) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासह जी. परमेश्वर यांनाही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांचा हा शपथविधी सोहळा विधानसौंध येथे पार पडला.

एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, शरद यादव यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्यासाठी 80 बाय 40 फुटांचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, शिवाय सुमारे एक लाखांपेक्षा अधिक लोकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्वांना हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी पंधराशेपेक्षा अधिक एलईडी स्क्रीन बसविण्यात आले होते.

Web Title: H D Kumarswamy taken Oath as Karnataka Chief Minister