ट्रायच्या अध्यक्षांनंतर हॅकर्सचे थेट मोदींना आव्हान

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधार नंबर देऊन हॅक करण्याचे आव्हान दिले होते. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. आपला दावा खरा करण्याच्या प्रयत्नात मात्र शर्माच पूर्ण फसले आहेत. 

नवी दिल्ली - देशभरात आधार कार्ड आणि डेटा सुरक्षिततेच्या मुद्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेल्या आहेत. आधार कार्ड आणि त्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा वारंवार चर्चेत आलेला असतानाच एका हॅकर्सने थेट ट्रायच्या अध्यक्षांचाच आधार नंबरवरून डेटा लिक करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आधार नंबर शेअर करण्याच आव्हान दिले आहे. 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधार नंबर देऊन हॅक करण्याचे आव्हान दिले होते. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. आपला दावा खरा करण्याच्या प्रयत्नात मात्र शर्माच पूर्ण फसले आहेत. 

शर्मा यांचे आव्हान पूर्ण केल्यानंतर हॅकर्सने ट्विट करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले. त्याने ट्विट करुन मोदींना आधार कार्ड क्रमांक विचारला आहे. मोदीजी तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रसिद्ध करु शकता का ? अशा आशयाचे ट्विट हॅकरने केले आहे.
  
दरम्यान, ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी ट्विटरवर आपला आधार कार्ड क्रमांक शेअर केला आणि डेटा हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिले. नुकसान किंवा हानी पोहोचेल, अशी कोणतीही माहिती शोधून दाखवावी असे त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून आव्हान दिले होते. शर्मा यांचे हे आव्हान हॅकर्स एलियट एल्डर्सन नावाच्या युजरनं स्वीकारलं आणि केवळ ते स्वीकारलंच नाही तर पूर्णदेखील केले. फ्रान्समधील सुरक्षा संशोधक असल्याचा दावा यावेळी एलियट एल्डर्सन यानं करत शर्मा यांची गोपनीय माहिती सार्वजनिक केली. काही मिनिटांतच एलियट एल्डर्सननं शर्मा यांचा पत्ता, आधार कार्डसोबत जोडण्यात आलेला मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, जन्मदिनांक आणि त्यांचे व्हॉट्सअॅपवरील फोटोदेखील एकामागोमाग ट्विट केले आहेत.

हे आव्हान पूर्ण केल्यानंतर एलियट एल्डर्सननं म्हटले आहे की, आता इथेच थांबतो परंतु, आधार क्रमांक सार्वजनिक करणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो. या नव्या प्रकरणामुळे यंत्रणेत खुप मोठ्या प्रमाणात दोष असल्याचे मात्र सिद्ध झाले आहे.

Web Title: Hacker Elliot Alderson asks PM Modi for Aadhaar no after leaking TRAI chief RS Sharmas personal details