काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईकचे प्रत्युत्तर दिले- सईद

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

भारताने जर पाकिस्तानात येणारे नद्यांचे पाणी अडवले. तर, त्याचे रक्तरंजीत परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तान काश्मिरशिवाय अपूर्ण आहे. काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी काश्मिरी लोकांच्या पाठीशी मी उभा आहे.

नवी दिल्ली - अखनूर, उरी आणि काश्मीरमध्ये इतर ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमधून भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला आम्ही चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे वक्तव्य करून मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईद याने पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानमधील फैसलाबाद येथील काश्मीर परिषदेच्या सभेत हाफिज सईद म्हणाला, की काश्मिरमधील 6,50,000 काश्मीरी मुस्लीमांच्या हत्येला भारतीय सैन्य जबाबदार आहे. आता कश्मिरी मुजाहिदीन त्यांना अखनूर, उरी आणि इतर ठिकाणच्या हल्ल्यांमधून योग्य उत्तर देत आहेत. 

सिंधू नदीच्या पाणीवाटपाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना सईद म्हणाला, भारताने जर पाकिस्तानात येणारे नद्यांचे पाणी अडवले. तर, त्याचे रक्तरंजीत परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तान काश्मिरशिवाय अपूर्ण आहे. काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी काश्मिरी लोकांच्या पाठीशी मी उभा आहे. आमचे हस्तक भारतावर हल्ले करुन त्यांना त्रास देत आहेत. भारत त्यांच्या कारवायांपासून त्यांना रोखू शकत नाही. मी एकटाच नाही, तर बलूच आणि पाकचे इतर लोकही आता काश्मीरच्या लढाईत त्यांच्यासोबत आहेत. बलूच नेते शाहजैन बुग्ती ही आता आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आता काश्मीर परिषदेत बलूच नेत्यांचे योगदान हा भारतासाठी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आमच्यासोबत येत असल्याचा संदेश आहे.

Web Title: Hafiz Saeed claims responsibility for Akhnoor attack on Indian soil by Pakistani terrorists