हाफिजचा मुलगा, जावई निवडणूक रिंगणात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

पाकिस्तानात 25 जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईदचा जावई आणि मुलगा उभा राहणार आहे. सार्वत्रिक आणि प्रांतिक निवडणुकीसाठी हाफिजची संघटना जमात उद दवाने अन्य पक्षाच्या चिन्हावर पाकिस्तानात उमेदवार उभे केले आहेत.

लाहोर : पाकिस्तानात 25 जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईदचा जावई आणि मुलगा उभा राहणार आहे. सार्वत्रिक आणि प्रांतिक निवडणुकीसाठी हाफिजची संघटना जमात उद दवाने अन्य पक्षाच्या चिन्हावर पाकिस्तानात उमेदवार उभे केले आहेत.

या निवडणुकीत सईद स्वत: उभा राहणार नाही. दहशतवादी कारवायात सहभागी असल्याने अमेरिकेने त्याच्यावर एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. हाफिजचा मुलगा हाफिज ताल्हा सईद हा एनए 91 या मतदारसंघातून, तर जावई हाफिल खालिद वलीद एनए 133 मतदारसंघातून अल्ला हू अकबर तेहरिककडून निवडणूक लढवत आहेत. या पक्षाचे निवडणूक चिन्ह खुर्ची असे आहे. 

Web Title: Hafiz's son and son are in law in the election battle