यंदाची हज यात्रा ४ जूनपासून - मुख्तार अब्बास नकवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hajj yatra from 4th June Saudi Arabia Mukhtar Abbas Naqvi new delhi
यंदाची हज यात्रा ४ जूनपासून - मुख्तार अब्बास नकवी

यंदाची हज यात्रा ४ जूनपासून - मुख्तार अब्बास नकवी

नवी दिल्ली : यंदा भारतातील हज यात्रेकरू ४ जूनपासून सौदी अरेबियाला जाऊ शकतील. मुंबईसह १० ठिकाणांहून यासाठी विशेष विमाने सोडण्यात येतील असे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले. गेल्या अनेक दशकांपासून भारतीय यात्रेकरूंचा, हज सबसिडीच्या नावावर राजकीय छळ होत होता तो मोदी सरकारने थांबविला असाही टोला त्यांनी लगावला. हज २०२२ साठी हज समन्वयक, हज सहायकांच्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन नक्वी यांच्या हस्ते दिल्लीत झाले. ते म्हणाले की मोदी सरकारने हज यात्रेची प्रक्रिया पारदर्शक करून सबसिडीची सियासी (राजकीय) छळवणूक संपुष्टात आणली.

यंदा भारतातून सुमारे ७९ लाखांहून जास्त यात्रेकरू हज यात्रेला जातील. मोदी सरकारने यात्रेकरूंचा कोटा २ लाखांपर्यंत वाढविला ही संख्या पाकिस्तानपेक्षाही जास्त आहे. यात मेहरम विना म्हणजे पुरूष यात्रेकरूंशिवाय एकटीने यात्रा करणाऱया २३४० मुस्लिम महिलांचाही समावेश आहे. येत्या ४ जूनपासून हजसाठीची विमाने सुरू होतील. मुंबईससह अहमदाबाद, बेंगळुरू, कोच्ची, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ व श्रीनगर या १० ठिकाणांहून ही विमाने सुटतील.

दोन वर्षांनंतर हजसाठी जाणाऱया यात्रेकरूंवर अनावश्यक आर्थिक बोजा पडणार नाही यासाठी मोदी सरकारने चोख व्यवस्था कल्याचे सांगून नक्वी म्हणाले की संपूर्ण हज यात्रा प्रक्रिया डिजीटल झाल्याने ‘ईझ आॅफ डुईंग हज' चे स्वप्न साकार झाले आहे. आरोग्य, सुरक्षा व यात्रेकरूंसाठी च्या सुविधा या तिन्ही बाजूंनी महत्वपूर्ण सुधारणांसह हजर २०२२ यात्रा संपन्न होणार आहे. सौदी अरेबियाच्या आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल व त्यादृष्टीने भारतीयांच्या कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यात येत आहे.भारतातून यंदा ७९, २३७ यात्रेकरू हजसाठी जातील. यातील ५० टक्के महिला आहेत. यातील ५६,६०१ यात्रेकरू भारतीय हज समितीच्या तर २२,६३६ यात्रेकरू खासगी ‘हज ग्रुप ऑर्गनायजर्स'(एचजीओ) यांच्या माध्यमातून यात्रा करतील.

Web Title: Hajj Pilgrimage Yatra From 4th June Saudi Arabia Mukhtar Abbas Naqvi New Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..