सहा वर्षे पाकिस्तानवास भोगलेला अन्सारी अखेर मायदेशी

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : गेल्या 6 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नागरिक हमीद नाहल अन्सारी आज पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. वाघा बॉर्डरवर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतमातेला वंदन केले. 

33 वर्षीय अन्सारी हे मुंबई येथील रहिवासी असून, ऑनलाईन माध्यमातून झालेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी ते अफगाणिस्तानातून ते पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले होते. 15 डिसेंबर, 2015 रोजी अन्सारी यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची रवानगी पेशावर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. तसेच अन्सारी यांची गेल्या 6 वर्षांपासून वकिलांशी भेटही होऊ दिली नाही. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते.

दरम्यान, भारत सरकारकडून 96 वेळा याबाबतचे तोंडी स्मरणपत्रे देण्यात आली होती. या सहा वर्षांच्या कालावधीत अन्सारी आणि त्यांच्या आईशी फक्त एकदाच फोनवरून संवाद झाला. अन्सारी हे हेरगिरी करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून त्यांच्यावर ठेवण्यात आला. 

Web Title: Hamid Ansari Crosses The Attari Wagah Border To Reach India