'हनुमान मुस्लिम होता म्हणूनच आमची नावं...'

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

''हनुमान हे मुस्लिम होते. त्यामुळेच मुस्लिमांमध्ये मुलांना नावे ठेवली जातात, त्यामध्ये रहमान, रमजान, फर्मान, झिशान, कुर्बानसारखी जेवढीही नावे ठेवली जातात. त्यांची ही नावे हनुमानांवरच ठेवली जातात, असे माझे मत असे आहे''.

- बुक्कल नवाब, आमदार, भाजप

नवी दिल्ली : भगवान हनुमान हे मुस्लिम होते. त्यामुळेच मुस्लिमांमध्ये रेहमान, रमजान, फरमान, झिशान आणि कुर्बान अशी नावे ठेवली जातात. यांसारखी नावे ही त्यांच्या नावावरूनच ठेवली जातात. असे आमचे म्हणणे आहे, असे वक्तव्य भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी आज (गुरुवार) केले. 

आमदार नवाब यांनी अयोध्येतील वादग्रस्त स्थळाबाबत यापूर्वीही वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांनी भगवान हनुमानाबाबत वक्तव्य केले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ''हनुमान हे मुस्लिम होते. त्यामुळेच मुस्लिमांमध्ये मुलांना नावे ठेवली जातात, त्यामध्ये रहमान, रमजान, फर्मान, झिशान, कुर्बानसारखी जेवढीही नावे ठेवली जातात. त्यांची ही नावे हनुमानांवरच ठेवली जातात, असे माझे मत असे आहे''.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राजस्थानमध्ये हनुमान हे दलित आणि वंचित होते, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता आमदार नवाब यांनी हे वक्तव्य केले आहे. 

Web Title: Hanuman was Muslim said BJP MLC Bukkal Nawab