जिंकली तीन राज्यं; सोनिया गांधींची एवढीच प्रतिक्रिया!

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या 3-0 निकालाने आनंदित आहे. हा भाजपच्या नकारात्मक राजकारणाविरोधातील विजय आहे, अशा शब्दांत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विजयाबद्दल आज (बुधवार) गौरोद्गार काढले. पाच राज्यांच्या निकालानंतर सोनिया गांधी यांनी संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधला. 

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला काही जागांवर समाधान मानावे लागत आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांत गेल्या काही वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली असून, काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर या विजयानंतर सोनिया गांधी यांनी सांगितले, की ''भाजपशासित हिंदी भाषिक प्रदेशात काँग्रेसचा विजय झाला आहे. या राज्यातील सत्ताधारी पक्षाने नकारात्मक राजकारण केल्याने काँग्रेसचा विजय झाला आहे. 3-0 या निकालाने मी आनंदित आहे. भाजपच्या नकारात्मक राजकारणाचा विजय आहे''. 

दरम्यान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र, या राज्यात भाजप किंवा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. या दोन्ही राज्यांत गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. 

Web Title: Happy with 3-0 score says UPA Chairperson Sonia Gandhi