पवन जल्लाद म्हणाले, मी तर चौघांना लटकावले...

happy to execute nirbhaya convicts says hangman jallad pawan
happy to execute nirbhaya convicts says hangman jallad pawan

मेरठ (उत्तर प्रदेश): गेल्या चार पिढ्यांपासून आमचे कुटुंब फाशी देण्याचे काम करत आहे. माझ्या पुर्वजांनी एका वेळी एक किंवा दोघांना फासावर लटकावले. पण, मी तर एकाच वेळी चौघांना फासावर लटाकवले आहे, असे जल्लाद पवन यांनी सांगितले.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या नवी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना आज (शुक्रवार) पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली. याप्रकरणात एकूण सहा आरोपी दोषी ठरले होते. त्यातील एक अज्ञान होता. त्यामुळे त्याला सुधारगृहात ठेवून शिक्षा पूर्ण करावी लागली, तर प्रकरणातील मुख्य आरोपीने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती.

तिहार कारागृहामध्ये चौघांना आज फासावर लटकावणाऱया जल्लाद पवनने पणजोबांचे रेकॉर्ड मोडले आहे. मेरठ शहरातील एका व्यक्तीला वारसा म्हणून घराण्याचे परंपरेने चालत आलेले 'जल्लाद'चे काम मिळाले होते. याच कुटुंबातील पवन जल्लाद यांनी चौघांना फासावर लटकावले. यासाठी पवन जल्लाद डमीला फासावर चढविण्यासाठी २ दिवस आधी तिहार तुरुंगात हजर झाले होते. पवन यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर यशस्वीपणे डमीला फासाच्या तख्तावर चढविण्यात आले. 1950-60 च्या दशकात या कुटुंबातील पहिल्या पिढीचे प्रमुख लक्ष्मण हे देशातील दोषींना फाशी देण्याचे काम करत होते. आता त्यांचे पणतू म्हणजेच लक्ष्मण यांचा मुलगा कालू राम जल्लाद यांच्या मुलाचा मुलगा पवन जल्लाद म्हणजेच या कुटुंबातील चौथ्या पिढीने चौघांना फासावर लटकावले आहे. पवन जल्लाद यांनी फाशी देण्याच्या प्रक्रियेतले सर्व बारकावे आजोबा कालू राम यांच्याकडून शिकून घेतले आहेत.

पवन जल्लाद म्हणाले, 'मी निर्भयाच्या दोषींना फासावर फासावर चढविण्यासाठी तयार होतो. हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. पूर्वजांनी आयुष्यात एका वेळीच एका किंवा दोन दोषींना फाशी दिली होती. मी मात्र माझ्या आयुष्यात पहिल्याच वेळी एकत्र चार दोषींना फासावर लटकवले आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com