भारताच्या गहू निर्यात बंदीवर G7 देशांची टीका, केंद्रीय मंत्री म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Wheat Export Ban

भारताच्या गहू निर्यात बंदीवर G7 देशांची टीका, केंद्रीय मंत्री म्हणतात...

नवी दिल्ली : भारताने दोन दिवसांपूर्वीच गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी (India Wheat Export Ban) घालण्यात आली आहे. अन्न-धान्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी ही निर्यात रोखण्यात आल्याचे सरकारकडून सागंण्यात आले आहे. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे G7 देशांनी भारताच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. त्यालाच आता केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे.

हेही वाचा: गहू निर्यात बंदी! दर कमी होऊन सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

भारतात गहू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. भारताच्या अन्नसुरक्षेवर लक्ष केंद्रित करून अन्नधान्याच्या किंमती नियंत्रित ठेवणे आणि बाजारातील साठेबाजीचा प्रश्न सोडविण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेजारी देश आणि संकटात असलेल्या देशांच्या अन्न-धान्यासंबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी भारत समर्थ आहे, असंही हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केलं.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचा गव्हाच्या किंमतीवर देखील परिणाम झाला आहे. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, कोणी निर्यातीवर निर्बंध घालत असेल किंवा बाजार बंद करत असेल तर महागाईचं संकट आणखी वाढू शकतं, असं जर्मन कृषीमंत्री ओजडेमिर यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हटलं. इतकेच नाहीतर G7 देशांनी बाजारातील गव्हाच्या किंमती नियंत्रित ठएवण्यासाठी गव्हावर निर्बंध लादू नये, अशी विनंती केली आहे. तसेच गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवावी, असं आवाहन देखील केलं आहे.

Web Title: Hardeep Singh Puri Replied G7 Criticism Over India Wheat Export Ban Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India
go to top