हार्दिक पटेलवरचे अटक वॉरंट रद्द

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पाटीदार आरक्षण आंदोलनावेळी एका भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीस अनुपस्थित राहणाऱ्या हार्दिक पटेल, सरदार पटेल संघटनेचे संयोजक लालजी पटेल व अन्य सहाजणांविरोधात न्यायालयाने काल (ता. 25) अटक वॉरंट काढले होते. मात्र हार्दिक पटेल व इतरांनी आज न्यायालयासमोर हजर होत यापुढील सुनावणीस उपस्थित राहण्याची हमी दिली. त्यानंतर न्यायालयाने हे वॉरंट रद्द केले

मेहसाना - पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्याविरुद्ध काढण्यात आलेले अटक वॉरंट आज विसनगरच्या सत्र न्यायालयाने रद्द केले. यापुढील सुनावणीस आपण नियमितपणे हजर राहू, असे आश्वासन हार्दिक पटेलने न्यायालयास दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

पाटीदार आरक्षण आंदोलनावेळी एका भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीस अनुपस्थित राहणाऱ्या हार्दिक पटेल, सरदार पटेल संघटनेचे संयोजक लालजी पटेल व अन्य सहाजणांविरोधात न्यायालयाने काल (ता. 25) अटक वॉरंट काढले होते. मात्र हार्दिक पटेल व इतरांनी आज न्यायालयासमोर हजर होत यापुढील सुनावणीस उपस्थित राहण्याची हमी दिली. त्यानंतर न्यायालयाने हे वॉरंट रद्द केले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे.

Web Title: hardik patel