फेक न्यूज नही चलेंगे तो मोदीजी कैसे चलेंगे: हार्दिक

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

फेक न्यूज करणाऱ्या पत्रकारांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मोदींनी परत घेतला आहे. कारण, फेक न्यूज चालणार नाहीत तर मोदी कसे चालतील. फेकम फेक. आज आपल्या देशाचे पंतप्रधान न सरदार आहेत न असरदार आहेत. ते फक्त मौन बाळगून आहेत.

अहमदाबाद : फेक न्यूज प्रकरणावरून पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत फेक न्यूज चालल्या नाहीत तर मोदी कसे चालतील, अशी खोचक टीका केली आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात खोट्या बातम्या म्हणजे 'फेक न्यूज' देणाऱ्या पत्रकारांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले. मात्र, याबाबतचे परिपत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मागे घेण्यात आले. यावरून हार्दिकने मोदींवर जोरदार टीका केली आहे.

हार्दिक पटेलने ट्विट करत म्हटले आहे, की फेक न्यूज करणाऱ्या पत्रकारांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मोदींनी परत घेतला आहे. कारण, फेक न्यूज चालणार नाहीत तर मोदी कसे चालतील. फेकम फेक. आज आपल्या देशाचे पंतप्रधान न सरदार आहेत न असरदार आहेत. ते फक्त मौन बाळगून आहेत.

Web Title: Hardik Patel criticize Narendra Modi on Fake News