पाटीदार नेते हार्दिक पटेलला जामीन

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

हर्दिक पटेल यांच्यासह लालजी पटेल आणि अन्य काही जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. त्यांची आज (गुरुवार) जामीनावर मुक्तता झाल्याने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे. 

अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना जामीन मंजूर केला.

हर्दिक पटेल यांच्यासह लालजी पटेल आणि अन्य काही जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. त्यांची आज (गुरुवार) जामीनावर मुक्तता झाल्याने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे. 

भाजप आमदाराच्या कार्यालयावर जुलै 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप हार्दिक पटेल आणि लालजी पटेल यांच्यावर आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच वीसनगरच्या सत्र न्यायालयाने हार्दिक पटेलच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले होते. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 89 जागांवर नऊ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 14 डिसेंबरला मतदान होणार आहे.

Web Title: Hardik Patel granted bail in 2015 vandalism case