तपास अधिकारी जागेवर नसल्याने हार्दिकची अटक टळली

पीटीआय
सोमवार, 27 मार्च 2017

अहमदाबाद- पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या 12 समर्थकांसह आज गुन्हे शाखेत हजर झाला; मात्र संबंधित अधिकारी तेथे उपस्थित नसल्याने या सर्वांची अटक तूर्त टळल्याचा प्रकार घडला आहे.

अहमदाबाद- पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या 12 समर्थकांसह आज गुन्हे शाखेत हजर झाला; मात्र संबंधित अधिकारी तेथे उपस्थित नसल्याने या सर्वांची अटक तूर्त टळल्याचा प्रकार घडला आहे.

दंगल व जाळपोळप्रकरणी हार्दिक व त्याच्या 12 समर्थकांवर गुन्हा नोंद आहे. आपण या समर्थकांसह आज (ता. 27) गुन्हे शाखेत शरण येऊ, असे हार्दिकने स्पष्ट केले होते. त्यानुसार आज तो पोलिस ठाण्यात दाखल झाला. मात्र संबंधित प्रकरणाचा तपास करणारे अधिकारीच तेथे उपस्थित नसल्याने या सर्वांना अटक करण्यात आली नाही. पटेल याच्याविरोधात रामोल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याचा तपास करणारे अधिकारी दुसऱ्या तपासासाठी बाहेरगावी गेल्याने ही अटक टाळण्यात आली. ते परत आल्यानंतर चौकशी होऊन सर्वांना अटक केली जाईल, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त बी. सी. सोळंकी यांनी दिली आहे.

Web Title: hardik patel investigating news