इंग्रजीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनींचे कपडे उतरवले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेवर गुन्हा दाखल

हरिद्वार : इंग्रजीच्या चाचणीत कमी गुण मिळविणाऱ्या दोन विद्यार्थिनींना कपडे काढण्याची शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील हरिद्वार जिल्ह्यात ही घटना घडली.

हरिद्वार जिल्ह्यातील लंढौरा येथील जे. पी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी सहावीतील दोन विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सहावीतील दोन विद्यार्थिनींना इंग्रजीच्या चाचणीत कमी गुण मिळाले होते. यामुळे शिक्षिकेने त्यांची खरडपट्टी काढली. त्यानंतर त्या दोघींना भरवर्गातच शर्ट काढण्याची शिक्षा केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक मणिकांत मिश्रा यांनी दिली.

या प्रकारामुळे धक्का बसलेल्या मुलींना अखेर पालकांना हा प्रसंग सांगितल्यानंतर याला वाचा फुटली. त्यानंतर पालकांनी संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाला दोन दिवस धारेवर धरले. अखेर शाळेच्या व्यवस्थापनाने त्या शिक्षकाला निलंबित केले. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.

Web Title: haridwar news student marks and teacher