'काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच होणार राम मंदिर'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

काँग्रेसचे सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर होणार असल्याचे महत्वपूर्ण विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी केले आहे. देशात काँग्रेसचे सरकार आल्यावरच अयोध्येत राम मंदिर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

देहरादून- काँग्रेस सत्तेत आल्यानंतरच राम मंदिर होणार असल्याचे महत्वपूर्ण विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी केले आहे. देशात काँग्रेसचे सरकार आल्यावरच अयोध्येत राम मंदिर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तराखंडमधील पराभवानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा या राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर रावत हे उत्तराखंडचा दौरा करत असून रावत हे शुक्रवारी ऋषिकेश येथे पोहोचले. रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपावर टीका केली.

यावेळी रावत म्हणाले की, मर्यादांचे उल्लंघन करणारे भाजपवाले हे पापी असून जे मर्यादा ओलांडतात ते मर्यादा पुरुषोत्तमाचे (प्रभू श्रीरामाचे) भक्त होऊच शकत नाही. आम्ही मर्यादेचे पालन करणारी लोक आहोत. उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारच्या काळात सुरु झालेल्या योजना भाजप जाणीवपूर्वक बंद करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. रावत यांनी राम मंदिरासंदर्भात विधान केल्याने काँग्रेसनेही हिंदू मतांवर डोळा ठेवून हे विधान केले असल्याची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Web Title: Harish Rawat Statement On Ram Mandir Slams Bjp