New Parliament Building : नवीन संसद भवनाची गरज काय होती? राज्यसभा उप-सभापतींनी विरोधकांना दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

harivansh narayan singh on need for new parliament Building on nitish kumar statment

New Parliament Building : नवीन संसद भवनाची गरज काय होती? राज्यसभा उप-सभापतींनी विरोधकांना दिलं उत्तर

New Parliament Building Inauguration : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनकार्यक्रमाला विरोधकांकडून विरोध करण्यात आला. आज अखेर देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षांने देखील विरोध दर्शवला. दम्यान आज त्यांच्याच पक्षाचे खासदार आणि राज्यसभा उप-सभापती हरिवंश नारायण सिंह यांनी या नव्या संसद भवनाची आवश्यकता का होती याबद्दल माहिती दिली आहे.

हरिवंश नारायण सिंह म्हणाले की, येत्या वर्षांमध्ये मतदारसंघाच्या पुर्नरचनेमुळे सदस्य संख्येत वाढीची शक्यात तसेच संसदेच्या वाढत्या जबाबदाऱ्या लक्षात घेता, विद्यमान संसद भवनातील जागा अपूरी पडू लागला होती. संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी पंतप्रधान मोदींनी नवीन भवन उभारण्यासाठी आग्रह केला होता.

ते पुढे बोलताना म्हणाले की, आपलं जुनं संसद भवन हे देशातील लोकशाहीचे केंद्र राहिले असून आपल्या प्रगतीसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. ही वास्तू भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून आणि संविधान निर्मितीपर्यंतच्या आपल्या गौरवशाली लोकशाही प्रवासादरम्यान अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे.

नितीश कुमार काय म्हणाले होते?

नितीश कुमार यांनी नवीन संसद भवन बांधण्याची आवश्यकता नव्हती असं वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जे भवन होतं तेच आणखी विकसीत केलं पाहिजे होतं. दुसरं संसद भवन बाधण्याचं काही कारण नव्हतं. देशाचा जुना इतिहास बदलला जात आहे असेही नितीश कुमार म्हणाले होते.