मोठी बातमी! 'बब्बर खालसा'चा हरविंदरसिंग संधू ऊर्फ रिंदा दहशतवादी घोषीत : Harwinder Singh Sandhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rinda

Harwinder Singh Sandhu : मोठी बातमी! 'बब्बर खालसा'चा हरविंदरसिंग संधू ऊर्फ रिंदा दहशतवादी घोषीत

नवी दिल्ली : बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या हरविंदरसिंह संधू ऊर्फ रिंदा याला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दहशतवादी घोषीत करण्यात आलं आहे. रिंदा सध्या पाकिस्तानात वास्तव्यास आहे. (Harwinder Singh Sandhu alias Rinda declared a terrorist)

स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारी 'बब्बर खालसा' ही दहशतवादी संघटना आहे. कॅनडा, जर्मनी आणि युकेमधून या संघटनेचं काम सध्या सुरु आहे. या संघटनेशी संबंधीत रिंदा हा भारतासाठी वॉन्टेड आहे, सध्या त्याचं पाकिस्तान वास्तव्य आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयनं त्याला आश्रय दिला आहे.

टॅग्स :Desh news