हरियाना विधानसभेच्या विशेष अधिवेशनात गोंधळ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

चंडिगड- राज्याच्या स्वर्णजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी सदस्यांनी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करीत गोंधळ घातला.

या अधिवेशनाचा भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि कॉंग्रेसने काल बहिष्कार केला होता, त्यांच्या या कृतीविरोधात कृषिमंत्री ओ. पी. धानकर यांनी आज निंदाव्यंजक ठराव मांडला. भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि कॉंग्रेस यांनी राज्याच्या स्थापनेत आपल्या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख सरकारने न केल्याबद्दल गुरुवारी त्यांच्यावर टीका केली होती.

तुम्ही परिषदेतून बाहेर गेला होतात वास्तविक ही परिषद कोणत्याही पक्षाची किंवा सरकारची नव्हती, तर ती सामान्य नागरिकांची होती, अशा शब्दांत धानकर यांनी विरोधकांना फटकार लगावली. मंत्री अनिल वीज म्हणाले, की राज्याच्या स्वर्णजयंती कार्यक्रमाबद्दल विरोधकांना काही देणे घेणे नाही. ते संसदीय लोकशाहीची थट्टा करीत आहेत. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे सदस्य हौदात उतरले आणि सरकारविरोधात घोषणा देऊ लागले.

Web Title: Haryana Assembly special session mess