हुतात्मा जवानाच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कुरुक्षेत्र (हरियाना) - आपण सारे हुतात्मा जवानाच्या कुटुंबियांच्या सोबत असल्याचे म्हणत हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी हुतात्मा जवान मनदीपसिंह यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.

कुरुक्षेत्र (हरियाना) - आपण सारे हुतात्मा जवानाच्या कुटुंबियांच्या सोबत असल्याचे म्हणत हरियानाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी हुतात्मा जवान मनदीपसिंह यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.

'आमच्या जवानाचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. आम्ही त्यांच्या (मनदीपसिंह) कुटुंबियांच्या सोबत आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देऊ', असे खट्टर यांनी जाहीर केले. 'आम्ही त्यांच्या कुटुंबियांना शक्‍य तेवढी सर्व मदत करू. मनदीपचे बलिदान कायम स्मरणात राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेल्या सूचना सरकारकडून विचारात घेतल्या जातील. आम्ही त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल', असेही खट्टर पुढे म्हणाले.

नियंत्रणरेषेजवल दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शनिवारी पंजाब रेजिमेंटमधील मनदीपसिंह जवान हुतात्मा झाला. दहशतवाद्यांनी पळून जाताना त्यांच्या पार्थिवाची विटंबना केली. या घटनेने देशभर संतापाची लाट उठली असून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले आहे.
 

Web Title: Haryana CM announces Rs. 50 lakh compensation to Kupwara brave heart's family