
- आता भाजप-जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) सरकार स्थापन
- राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी 10 मंत्र्यांना दिली पद आणि गोपनियतेची शपथ.
चंदिगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता भाजप-जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) सरकार स्थापन झाले. या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार) पार पडला. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी 10 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
भाजपच्या कोट्यातून आठ, जेजेपीच्या एका आमदाराने तर एका अपक्ष आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. जेपी दलाल, बनवारी लाल, कंवरपाल गुर्जर, मूलचंद शर्मा, रंजितसिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर अनुप धानक, ओम प्रकाश यादव, कमलेश ढांडा आणि माजी हॉकीपट्टू संदीप सिंह यांनीही राज्यमंत्रिपदाची (स्वतंत्र कार्यभार) शपथ घेतली.
फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
आता हे सर्व मंत्री मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री म्हणून जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला हे काम पाहणार आहेत.
अनिल विज पुन्हा मंत्रिमंडळात
मनोहर लाल खट्टर यांच्या पूर्वीच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले अनिल विज यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. आता त्यांच्याकडे कोणते मंत्रिपद देण्यात येते हे आता पाहावे लागणार आहे.