Haryana Election 2019 : हरियानात 23.12 टक्के मतदान

Haryana Election 2019 : हरियानात 23.12 टक्के मतदान

नवी दिल्ली : हरियाना विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सातपासून मतदानाला सुरवात झाली असून, सायंकाळी सहापर्यंत मतदान सुरु असणार आहे. सकाळी अकरापर्यंत 23.12 टक्के मतदान झाले. 

विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होत आहे. बावणी खेरा मतदारसंघात सर्वाधिक 40 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान पतौडी मतदारसंघात झाले. या मतदारसंघात 14 टक्के मतदान झाले. याशिवाय कल्का 30.10 टक्के, पंचकुला 32.40 टक्के, नारायणगड 33 टक्के, अंबाला 32.60 टक्के, अंबाला शहर 30.45 टक्के, मुलाना मतदारसंघात 39.50 टक्के तर सधौरा मतदारसंघात 42 टक्के मतदान पार पडले. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी अकरापर्यंत 23.12 टक्के मतदान पार पडले असून, याची संपूर्ण आकडेवारी सायंकाळी 6 नंतरच समोर येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com