हरियाणात पुन्हा फुलले 'कमळ'

हरियाणात पुन्हा फुलले 'कमळ'

नवी दिल्ली : हरियाणात बहुमतापासून सहा जागा दूर असलेल्या भाजपला अखेर दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी म्हणजे जेजेपीच्या दहा आमदारांची साथ मिळाली आहे. हरियाणाच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असून, भाजपचे मुख्यमंत्री तर जेजेपीचे उपमुख्यमंत्री असतील असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज रात्री जाहीर केले.

शहा यांच्या घरी सुरू असलेली बैठक रात्री दहाच्या सुमाराला संपली हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, जे. पी. नड्डा, अनिल जैन यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. हरियाणात 40 जागा मिळालेल्या भाजपला त्यासाठी आवश्यक असलेले 6 आमदारांचे बळ ७ अपक्ष आमदारांनी दिलेल्या पाठिंब्याने आधीच पूर्ण झाले होते. मात्र, चौटाला यांच्या पक्षाच्या दहा आमदारांचा बूस्टर डोस मिळाल्याने भाजपला आता सत्तेसाठी एकेका आमदाराची मनधरणी करावी लागणार नाही. भाजप आणि सर्व मित्रपक्ष मिळवून हरियाणात सत्तारूढ आघाडीचे बळ 57 झालेले आहे.

चौटाला यांनी आज दुपारी तिहार तुरुंगात असलेले आपले वडील अजय चौटाला यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी, केंद्र व राज्यातही स्थिर व सक्षम सरकार हे राज्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राजकारणात आपण कोणालाही अस्पृश्य मानत नसल्याचे सांगून त्यांनी भाजपकडे आपला कल दर्शविला.

स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण तसेच शेतकऱ्यांसाठीच्या मागण्या चौटालांनी पुढे रेटले आहेत. उपमुख्यमंत्रिपदाशिवाय किमान तीन मंत्रिपदाचीही त्यांची मागणी आहे. भाजपने त्यांच्या सर्व मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहा यांनी आपला अहमदाबाद दौरा सोडून आज रात्री परत दिल्लीकडे धाव घेतली. चौटाला यांच्याशी त्यांची चर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com