
Crime : करोडपती चोर! लग्झरी कारमधून करत होता रस्त्यावरच्या कुंड्यांची चोरी; अटक करताच...
नवी दिल्ली - जी-२० शिखर परिषदेसाठी लावण्यात आलेली कुंड्या चोरीप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. गुरुग्राम पोलिसांनी मनमोहनला अटक केली असून कारमधून चोरीच्या कुंड्या जप्त केल्या आहेत.
कार हरियाणातील हिसार येथून नोंदणीकृत असून आरोपी गुरुग्रामचा रहिवासी आहे. चोरट्यांच्या लक्झरी कारचा नंबरही व्हीआयपी आहे. चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीएमडीएने पोलिसांत तक्रार दिली होती.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गुरुग्राममधील शंकर चौकातील आहे. व्हिडीओमध्ये एक गाडी येऊन थांबते असे दिसते. दोन जण गाडीतून खाली उतरतात. चौकात सजावटीसाठी ठेवलेल्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींच्या कुंड्या उचलून गाडीच्या डिक्कीत ठेवली जातात.
गुरुग्रामच्या एम्बियंस मॉलमधील लीला हॉटेलमध्ये जी-20 परिषदेची तयारी बऱ्याच दिवसांपासून जोरात सुरू आहे. यामध्ये परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना इम्प्रेस करण्यासाठी शहर सजवले जात आहे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या फूटपाथवरही खास प्रकारची रोपे लावली जात आहेत.