काँग्रेसच्या रॅलीमुळे रुग्णवाहिका अडकली ; अर्भकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

हरियानात काँग्रेसच्या सायकल रॅलीत रुग्णवाहिका अडकल्याने एका नवजात अर्भकाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. याबाबतच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चार सदस्यीय समितीमार्फत तपास केला जात आहे.

गुडगाव : हरियानात काँग्रेसच्या सायकल रॅलीत रुग्णवाहिका अडकल्याने एका नवजात अर्भकाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. याबाबतच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चार सदस्यीय समितीमार्फत तपास केला जात आहे. ही सायकल रॅली हरियाना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आली.

हरियानाच्या सोनिपत जिल्ह्यात ही घटना काल (बुधवार) घडली. याबाबत एका वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेसकडून 'हरियाना बचाओ, परिवर्तन लावो', सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमुळे वाहतूकव्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे रुग्णवाहिकेमध्ये असलेल्या नवजात अर्भकावर वैद्यकीय उपचार करण्यात अडचणी आल्या. त्यामुळेच या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला, असा आरोप अर्भकाच्या नातेवाईकांनी केला.

दरम्यान, काँग्रेसच्या रॅलीमुळे नवजात अर्भक असणारी रुग्णवाहिकेला 45 मिनिटे उशीर झाला. रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधाही नसल्याचे अर्भकाच्या वडिलांनी सांगितले. 

Web Title: In Haryana Newborn dies as ambulance gets stuck in Congress rally probe ordered