हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

"एसआयटी'च्या तपासातील माहिती; चामकौर सिंग मध्यस्थ

पंचकुला : "डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख आणि कथित आध्यात्मिक गुरू गुरमित रामरहीम सिंग याच्या अटकेनंतर हरियानामध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा तपास करण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती धक्कादायक माहिती लागली आहे. जमावाला चिथावणी देण्यासाठी "डेरा'ने पाच कोटी रुपये खर्च केले होते, असे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे.

"डेरा'च्या पंचकुला शाखेचा प्रमुख चामकौर सिंग याच्याकडे पैशाच्या खर्चाचे नियोजन सोपविण्यात आले होते. "डेरा'च्या व्यवस्थापनाने हा निधी त्याच्याकडे सोपविला होता. चामकौर हा मोहाली जिल्ह्यातील ढाकोली गावचा रहिवासी असून, त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत बेपत्ता झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली होती. पंचकुलाप्रमाणेच "डेरा'ने पंजाबमधील विविध ठिकाणांवर पैसे पाठविले होते. ज्या ठिकाणी "डेरा'चे पैसे पोचले तेथे मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामध्ये तुम्हाला काही दुखापत झाली तर "डेरा' नुकसान भरपाई देईल असे आश्‍वासन बाबांच्या भक्तगणांना देण्यात आले होते.

संभाव्य ठिकाणांचा शोध
चामकौर याच्या अटकेनंतर आणखी सविस्तर माहिती हाती येईल अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. सध्या पोलिसांची पथके चामकौरचा शोध घेत असून त्याच्या लपण्याची संभाव्य ठिकाणे शोधली जात आहेत, असे हरियानाचे पोलिस महासंचालक बी. एस. संधू यांनी सांगितले. या हिंसाचारासाठी अनेक बड्या मंडळींनी पाठिंबा दिला होता. राज्यातील एका बड्या कृषी संशोधकाने हिंसाचारासाठी पैसे पुरविले होते, असा दावाही पोलिसांनी केला आहे.

भक्तांसाठी लंगर
गुरमित रामरहीम सिंगच्या खटल्याची पंचकुला न्यायालयातील सुनावणी सुरू झाल्यानंतर त्याच्या भक्तांनी "डेरा'च्या आवारामध्ये जमायला सुरवात केली होती. या वेळी भक्तांसाठी चामकौरनेच लंगर सुरू केले होते. याला स्थानिक लोकांचाही पाठिंबा होता. या लोकांनी जमावाला चिथावणी दिलीच; पण त्याचबरोबर अनेकांना शस्त्रेही उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे या नियोजनाचा साधा सुगावाही तपास यंत्रणेला लागला नव्हता, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: haryana news Financial support of "Dera" to violence