बलात्कार पीडितेस पोलिसांनी केले निर्वस्त्र

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

या पीडित युवतीवर बलात्कार झाल्यानंतर पोलिसांनी तिला चौकशीच्या नावाखाली निर्वस्त्र होण्यास भाग पाडले; आणि बलात्कार झाल्याची खात्री करण्यासाठी तिला स्पर्शही करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे

चंडीगड - हरयाना राज्यामधील एका 14 वर्षीय बलात्कार पीडितेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पंजाब व हरयाना उच्च न्यायालयाने राज्याच्या पोलिस महासंचालकांस नोटिस बजाविली आहे. या युवतीस पोलिस दलामधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी निर्वस्त्र होण्यास भाग पाडल्याचे निष्पन्न झाले आहे.

हरयाना राज्य सरकारने या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे. हे प्रकरणे नोव्हेंबर, 2016 मध्ये घडल्याचे सूत्रांनी सांगितले. "हे अत्यंत गंभीर प्रकरण असून आम्ही या प्रकरणी तत्काळ तपास सुरु केला आहे,' अशी माहिती राज्याचे अतिरिक्त गृहसचिव राम निवास यांनी दिली आहे. या प्रकरणी दोषींना कडक शासन केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या पीडित युवतीवर बलात्कार झाल्यानंतर पोलिसांनी तिला चौकशीच्या नावाखाली निर्वस्त्र होण्यास भाग पाडले; आणि बलात्कार झाल्याची खात्री करण्यासाठी तिला स्पर्शही करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पोलिस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, न्यायालयाने पोलिस महासंचालकांस नोटिस बजाविली आहे.

Web Title: Haryana police ask rape survivor to strip