हरियाना, पंजाबसह उत्तर भारत गारठला
नवी दिल्ली/श्रीनगर : हरियाना, पंजाबसह अवघा उत्तर भारत कडाक्याच्या थंडीमुळे गारठून गेला असून, काश्मीरमध्ये लेह भागात यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे उणे 15.8 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदल्या गेले आहे. हरियानातील हिसार, अंबाला आणि नारनौल येथील पारा घसरला असून रोहतक, भिवानी आणि सिरसामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.

पंजाबमधील आदमपूर भागामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी नीचांकी तापमानाची नोंद झाली. येथील तापमान 0.2 अंश सेल्सिअसवर पोचले आहे. अमृतसर, लुधियाना, पतियाळा, पठाणकोट, हालवाडा आणि भटिंडामध्येही थंडीची तीव्रता वाढली आहे. हरियाना आणि पंजाब राज्यांची संयुक्त राजधानी असलेल्या चंडीगडमध्ये 4.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या दोन्ही राज्यांमध्ये थंडीसोबत धुके पडल्याने दृश्यमानताही खालावली आहे.
हिमाचल प्रदेशातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाहौल आणि स्पितीमधील केलॉंग येथे नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, येथील तापमान उणे 8.8 अंश सेल्सिअसवर पोचले आहे. मनाली, सोलन, काल्पा, सेओबाग, भुंतार आणि सुंदरनगर हे भागदेखील गारठून गेले आहेत.