Haryana: हरियाणात मोठी दुर्घटना, तीन मजली राईस मिल कोसळली; दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haryana

Haryana: हरियाणात मोठी दुर्घटना, तीन मजली राईस मिल कोसळली; दोघांचा मृत्यू

हरियाणातील करनाल जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील तरवाडी येथे एका राईस मिलची तीन मजली इमारत कोसळली. या इमारतीत राईस मिलचे कामगार झोपायचे. ढिगाऱ्याखाली अनेक मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे.(Haryana Rice Mill Building Collapses in Karnal Workers Trapped Under Debris )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर २० कामगार जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 5 ते 6 मजूर अजूनही आत असल्याची भीती आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्वांना बाहेर काढले जाईल. असंही पोलिस म्हणाले.

राईस मिलची इमारत कशी पडली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र तीन मजली इमारत कोसळल्याने मिलच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ही इमारत इतकी जुनी असताना त्यात 200 मजूर का ठेवण्यात आले? असेही विचारण्यात येत आहे.