हुतात्मा जवानावर हरियानात अंत्यसंस्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

सिंह यांचे पार्थिव आज सकाळी गावी आणण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गावात येऊन मनदीप यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मनदीप यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी 50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करताना कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी दिली जाईल, असेही सांगितले

अंतेहरी - काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत हुतात्मा झालेले जवान मनदीप सिंह यांच्यावर रविवारी हरियानाच्या कुरूक्षेत्र जिल्ह्यातील अंतेहरी या त्यांच्या मूळ गावी संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

सिंह यांचे पार्थिव आज सकाळी गावी आणण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गावात येऊन मनदीप यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. मनदीप यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी 50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करताना कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी दिली जाईल, असेही सांगितले. दहशतवाद्यांनी मनदीप यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. मनदीप यांच्या हौतात्म्यामुळे यंदा गावात दिवाळी साजरी केली जाणार नसल्याचे सरपंच सुभाष चंद्रा यांनी सांगितले.

Web Title: haryana salutes the martyr