टिकटॉक व्हिडिओसाठी गळ्याला लावला फास अन्...

haryana youth hanged for tiktok video
haryana youth hanged for tiktok video

नवी दिल्ली : टिकटॉक व्हिडिओसाठी एकाने गळ्याला फास लावण्याचा प्रयोग केला. व्हिडिओ शुटींग करत असताना सुदैवाने दोरी तुटल्यामुळे त्याचा जीव वाचल्याची घटना हरियाणामध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिकटॉकवर अनेकजण हटके व्हिडिओ तयार करण्यासाठी नको-नको ते प्रकार करताना दिसतात. विचित्र व्हिडिओंमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळण्यासाठी अनेकजण काहीही करायला तयार होताना दिसतात. हरियाणातील जिंदमध्ये विकास नावाच्या युवकाने हटके व्हिडिओ तयार करण्यासाठी झाडाला दोरी बांधली. दोरीचा फास गळ्याभोवती घेतला अन् शुटींग सुरू केले. गळफास बसत असतानाच सुदैवाने दोरी तुटल्यामुळे त्याचा जीव बचावला. विकास सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे.

विकासच्या काकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'नेहरा गावात राहणाऱ्या रमन याने त्यांचा पुतण्या विकासला 22 ऑक्टोबरला फोन करून शेतात बोलावून घेतले. टिकटॉक व्हिडिओसाठी विकासला फाशी घ्यायला सांगितली. नकार देताच पुतण्याला जातीवाचक शिवीगाळ केली.'

पोलिस अधिकारी कृष्ण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हरियाणातील जिंद येथे टिकटॉक व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका युवकाच्या गळ्यात फास अडकवून झाडावर चढवण्यात आले. झाडावर चढलेल्या तरुणाच्या आयुष्याची दोरी बळकट होती. झाडावरून त्याने गळ्यात फास अडकलेल्या स्थितीत उडी मारली. त्यानंतर व्हिडिओ शूट करेपर्यंत तो तरुण दोरी तुटल्याने खाली पडला आणि जखमी झाला. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी व्हिडिओ कऱणाऱ्या युवकाविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com