काँग्रेसमध्ये जाता-जाता सपना चौधरीचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

प्रसिद्ध डान्सर आणि गायक सपना चौधरीने आज (ता.07) अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सपनाने भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्षात प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली : प्रसिद्ध डान्सर आणि गायक सपना चौधरीने आज (ता.07) अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सपनाने भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडिअयमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजपा महासचिव रामलाल आणि दिल्लीचे भाजप प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकांपूर्वी सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर ती भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. पण आता अधिकृतपणे सपनाने भाजपत प्रवेश केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकांपूर्वी सपनाने भाजपत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, ऑक्टोबर 2019 पर्यंत हरियाणात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सपनाला कोणत्या विधानसभा मतदारसंघातून भाजप तिकीट देणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryanavi Dancer Sapna Chaudhary Joins Bjp