कॉलगर्लसोबत राहणाऱ्याला शमीला क्लीन चिट मिळते कशी ? ; हसीन जहाँचा सवाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वीच मोहम्मद शमीला क्लिन चीट दिली. त्यावर हसीन जहाँने ''कॉर्लगर्लसोबत राहणाऱ्या व्यक्तीला क्लीन चिट मिळते कशी ?", असा सवाल उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यामध्ये असलेला तणाव थांबण्याचे चिन्हे दिसत नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वीच मोहम्मद शमीला क्लिन चीट दिली. त्यावर हसीन जहाँने ''कॉर्लगर्लसोबत राहणाऱ्या व्यक्तीला क्लीन चिट मिळते कशी ?", असा सवाल उपस्थित केला आहे.

Hasin jahan

हसीन जहाँ ही आत्तापर्यंत तिचा पती शमीवर नाराज होती. त्यानंतर आता तिने आपली नाराजी थेट बीसीसीआयवर व्यक्त केली. शमीला क्लीन चिट दिल्यानंतर तिने प्रश्न उपस्थित केला असून, कॉलगर्लसोबत राहणाऱ्या खेळाडूला बीसीसीआयने क्लीन चिट दिलीच कशी ? तसेच तिने बीसीसीआयवरही गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, ''शमी कॉलगर्लसोबत ज्या हॉटेलमध्ये जात होता, त्याची पूर्ण व्यवस्था बीसीसीआय करत होती. त्यामुळे यावर स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी बीसीसीआयची आहे. बीसीसीआय आपल्या आवडत्या खेळाडूंनी कोणताही गुन्हा केला असलातरी त्यांना वाचवते''.  

दरम्यान, बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शमीला क्लिन चिट देत फक्त त्याचे नाव कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सामील केले आहे. तसेच त्याला आयपीएल खेळण्याची परवानगीही दिली आहे.  

Web Title: Hasin Jahan Angry On BCCI After Given Clean Chit To Mohammed Shami Hasin Jahan Criticizes