Hathras Case Live Update : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक; माझा अपराध काय? राहुल यांचा पोलिसांना प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस इथं झालेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद आता देशभरात उमटत आहेत. 

हाथरस - उत्तर प्रदेशातील हाथरस इथं झालेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद आता देशभरात उमटत आहेत. दरम्यान, बलात्कार पीडितेच्या कुटंबियांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक कऱण्यात आली आहे. त्याआधी राहुल गांधी यांना पोलिसांकडून लाठीने मारहाणही झाली आहे. 

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा अध्यक्ष मायावती यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणाबद्दल योगी सरकारला जबाबदार धरलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, योगीजी, आपणही एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. तुम्ही महिलांचं संरक्षण करु शकत नसाल तर राजीनामा द्या. केंद्र सरकारने नेतृत्वात बदल करावेत, किंवा इथं राष्ट्रपती शासन लागू करावे, असंही त्या म्हणाल्या आहेत. भाजप सरकारमध्ये राज्यात केवळ गुंड, बदमाश, माफिया आणि बलात्काऱ्यांचं राज्य सुरू आहे, असा हल्लाबोल मायावती यांनी केलाय.

राहुल गांधी यांच्यावर कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राहुल गांधींच्या अटकेनंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा तर लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras case live update rahul gandhi priyanka gandhi uttar pradesh