‘लिंक्डइन’वर होतेय मिनिटाला ‘हॅट्‌ट्रिक’

वृत्तसंस्था
Saturday, 31 October 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आर्थिक चक्रे ठप्प झाल्याने रोजगाराचा प्रश्‍न देखील बिकट झाला आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेकांना नोकऱ्यांना मुकावे लागले असले तरीसुद्धा काहींना रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या आहेत. ‘लिंक्डइन’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून दर एका मिनिटाला तीन लोकांना नोकऱ्या मिळत असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी केला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या  चार कोटी लोकांना यामुळे झाली आहे.

‘मायक्रोसॉफ्ट’चे सीईओ सत्या नाडेला यांची माहिती; संकेतस्थळाचे रूप बदलल्याने यूजरकडून प्रतिसाद
नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आर्थिक चक्रे ठप्प झाल्याने रोजगाराचा प्रश्‍न देखील बिकट झाला आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये अनेकांना नोकऱ्यांना मुकावे लागले असले तरीसुद्धा काहींना रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या आहेत. ‘लिंक्डइन’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून दर एका मिनिटाला तीन लोकांना नोकऱ्या मिळत असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी केला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या  चार कोटी लोकांना यामुळे झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जाहिरात व्यवसाय पूर्वपदावर
लिंक्डइनवरील जाहिरातींचा प्रवाह पूर्ववत होऊ लागला असून कोराेनामुळे गमावलेला व्यवसाय चाळीस टक्क्यांनी सावरला आहे. उद्योजकांनी व्यावसायिकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी या टूलचा वापर करायला सुरवात केली असल्याचे नाडेला यांनी स्पष्ट केले. यूजरला सर्चिंग करणे, मेसेजिंग यांचा  लाभ घेता यावा म्हणून संकेतस्थळाच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. लिंक्डइनची मालकी ही मायक्रोसॉफ्टकडे आहे. मागील महिन्यात या संकेतस्थळाने कात टाकली होती.

Image may contain: 1 person, text that says "संकेतस्थळाची व्याप्तरी ७२.२ कोटी २ टक्के यूजर वर्षभरात झालेली वाढ १० लाखांपेक्षाही अधिक तास आठवडाभरातील कंटेट पाहण्याचा काळ सत्या नाडेला स्नॅपचॅट स्टोरीज नव्या सुविधा ब्लू जीन्स झूम B Linked यांना अच्छे दिन प्रोग्रमिंग मशिन लर्निंग डेटा स्ट्रक्चर डिजिटल मार्केटिंग एचटीएमएल-५ व्हिडिओ इंटिग्रेशन Ti: टीम्स"

केंद्राकडून लशीच्या वितरणाची तयारी; आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना सूचना

संधी, स्पर्धा दोन्ही वाढल्या
लिंक्डइन स्टोरीज फिचरच्या माध्यमातून यूजरला वीस सेकंदांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची परवानगी मिळते. ते यूजरच्या प्रोफाईलवर २४ तास दिसत राहते. सध्या रोजगाराच्या पातळीवर आशादायी असे वातावरण आहे. नियुक्त्यांच्या प्रमाणामध्ये ऑगस्ट- २०२० मध्ये बारा टक्के वाढ झाली आहे. या स्पर्धेमध्ये मात्र तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hattrick per minute on LinkedIn