'दोनपेक्षा अधिक मुलं जन्माला घाला, इन्सेंटिव्ह देतो'

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

''राज्यात दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म दिल्यास संबंधित दाम्पत्याला 'इन्सेंटिव्ह' देण्यात येईल''.

- चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश

नवी दिल्ली : राज्यात दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म दिल्यास संबंधित दाम्पत्याला 'इन्सेंटिव्ह' देण्यात येईल, अशी घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. तसेच दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या उमेदवाराला निवडणूक लढवता येईल, असेही ते म्हणाले. 

आंध प्रदेशातील लोकसंख्येत मागील 10 वर्षांमध्ये 1.6 टक्के इतकी घट झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता कमावणारे हात कमी आणि खाणारे तोंड जास्त असे होऊ शकते, असे नायडू म्हणाले. तसेच राज्यातील लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या ही तरुण पिढीची आहे. त्यामुळे राज्याला तरुण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त मुलं जन्माला घातली पाहिजे. राज्यात दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म दिल्यास संबंधित दाम्पत्याला 'इन्सेंटिव्ह' देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्री नायडू यांनी दोनपेक्षा जास्त मुलं जन्माला घातल्याने निवडणूक लढवता न येण्याची अटही शिथिल केली आहे.

Web Title: Have more kids keep state young says Andhra CM Chandrababu Naidu