'एआयडीएमके'तील दरी दूर होण्याची शक्‍यता

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. एआयडीएमके पक्षाचे नेते शशिकला आणि पनीरसेल्वम यांच्यातील मतभेदामुळे पक्षात दरी निर्माण झाली आहे. ही दरी नष्ट करून सर्वांनी एकत्र काम करण्याबाबत सोमवारी रात्री उशिरा एआयडीएमकेचे नेते पी. थांगमनी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्यातील 25 मंत्री उपस्थित होते. त्यामुळे एआयडीएमकेतील सर्व नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

चेन्नई (तमिळनाडू) - तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. एआयडीएमके पक्षाचे नेते शशिकला आणि पनीरसेल्वम यांच्यातील मतभेदामुळे पक्षात दरी निर्माण झाली आहे. ही दरी नष्ट करून सर्वांनी एकत्र काम करण्याबाबत सोमवारी रात्री उशिरा एआयडीएमकेचे नेते पी. थांगमनी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्यातील 25 मंत्री उपस्थित होते. त्यामुळे एआयडीएमकेतील सर्व नेते एकत्र येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ओ. पनीरसेल्वम यांनी सोमवारी 'एआयडीएमके'तील सर्व नेत्यांनी पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. 'एकत्र येण्याविषयीच्या चर्चेला बोलावले, तर मी चर्चा करण्यास उत्सुक आहे', असे पनीरसेल्वम यांनी म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर थांगमनी यांच्या चेन्नईतील निवासस्थानी सोमवारी रात्री उशिरा बैठक घेण्यात आली. या बैठकीला 25 मंत्री उपस्थित होते. या वृत्ताला तमिळनाडूतील मंत्री डी. जयकुमार यांनीही दुजोरा दिला. एकत्र येण्यासंदर्भातील पनीरसेल्वम यांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले. 'ओ. पनीरसेल्वम यांनी दिलेल्या सूचनेचे आम्ही स्वागत करतो. आम्ही पुढील चर्चा करणार आहोत', असेही जयकुमार यांनी सांगितले.

जयललिता यांच्या निधनामुळे आरके नगर येथील जागा रिकामी झाली आहे. या जागेवर झालेल्या नुकतीच पोटनिवडणुक झाली. नंतर ही निवडणूक रद्द करण्यात आली. दरम्यान त्यापूर्वी एआयडीएमकेचे दोन पानांचे चिन्ह शशिकला यांच्या गटाला मिळावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना त्रयस्थ व्यक्तीकडून लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शशिकला यांचे पुतणे आणि एआयडीएमकेचे उपसचिव दिनकरन यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतरही एआयडीएमकेतील दरी दूर करण्याबाबत घडामोडी घडत आहेत. दरम्यान, पक्षातील बहुतेक नेते दिनकरन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

Web Title: Have Panneerselvam and Sasikala patched up?