चिदंबरम यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची मुभा

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

एअरसेल-मॅक्‍सिसप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान दिल्ली न्यायालयाने चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना 18 डिसेंबरपर्यंत अटक करू नये, असे सीबीआय आणि ईडीला सांगितले आहे.
 

नवी दिल्ली: एअरसेल-मॅक्‍सिसप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान दिल्ली न्यायालयाने चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना 18 डिसेंबरपर्यंत अटक करू नये, असे सीबीआय आणि ईडीला सांगितले आहे.

एअरसेल-मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी अन्य आरोपींविरुद्ध खटला चालवण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत मागितल्याचे सीबीआयने म्हटले आहे. त्याच वेळी चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांना 18 डिसेंबरपर्यंत अटक करू नये, असे दिल्ली न्यायालयाने सांगितले.

Web Title: Have Sanction To Prosecute P Chidambaram In Aircel Maxis Case