मोदीजी येताना काळा पैसा आणलात का?: राहुल गांधी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नवी दिल्ली - दावोस येथे झालेल्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या 48व्या वार्षिक सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये होते. ही सभा झाल्यानंतर भारतात परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष केले आहे. राहुल गांधी यांनी ''प्रिय पंतप्रधान, तुमचे भारतात स्वागत आहे. तुम्ही काळ्या पैशासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची यावेळी मला आठवण करून द्यावीशी वाटते. तुम्ही विमानातून स्वित्झर्लंडमधील काळा पैसा परत आणला असेल तर भारतातील तरुणांना आश्चर्य वाटेल'' असे ट्विट केले आहे.

यापूर्वीही राहुल यांनी ऑक्सफॅम संस्थेच्या अहवालाचा दाखला देत मोदींवर शेरेबाजी केली होती. संस्थेच्या अहवालात एक टक्का भारतीयांकडे 73 टक्के संपत्ती जमा झाल्याची माहिती देण्यात आली होती. या अहवालाच्या बातमीसह राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरून त्यांना लक्ष केले होते. 

याशिवाय, राहुल गांधी यांनी 'पद्मावत' चित्रपटाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनासाठीही मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. 'पद्मावत' या चित्रपटाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी बुधवारी गुडगावमध्ये लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला केला. यासंदर्भात राहुल यांनी म्हटले की, लहान मुलांवरील या हल्ल्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. हिंसा आणि द्वेष ही दुर्बलांची शस्त्रे आहेत. भाजपाही याच शस्त्रांचा वापर करून देशात अराजक पसरवत आहे.

Web Title: Have You Brought Back Black Money from Switzerland in Your Plane: Rahul Gandhi’s Jibe at PM Narendra Modi