जयललिता समर्थकाची याचिका फेटाळली

पीटीआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

जयललिता या स्वतः उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, त्यांनी पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते; तसेच त्यांनी राज्यातील जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या, त्यामुळे जयललितांना "भारतरत्न' देण्यात यावा, असे याचिकेत म्हटले होते

चेन्नई - अण्णा द्रमुकच्या दिवंगत नेत्या आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना "भारतरत्न' देण्याची मागणी करणारी याचिका आज मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले.

मागील वर्षी 5 डिसेंबर रोजी दिवंगत झालेल्या जयललिता यांना "भारतरत्न' देण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. जयललिता या स्वतः उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, त्यांनी पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते; तसेच त्यांनी राज्यातील जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या, त्यामुळे जयललितांना "भारतरत्न' देण्यात यावा, असे याचिकेत म्हटले होते. न्यायालयाने मात्र ही याचिका फेटाळून लावली.

Web Title: HC dismisses demand of granting Bharata Ratna to Jayalalitha