मोदींच्या निवडणुकीविरोधातील याचिका फेटाळली

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

अलाहाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 

काँग्रेसचे आमदार अजय राय यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने मोदी यांच्या वकिलाने घेतलेल्या प्राथमिक आक्षेपाला परवानगी दिली, आणि अजय राय यांची याचिका फेटाळली. राय हे 2014 मध्ये या निवडणुकीत पराभूत झाले होते. 

"या याचिकेवर सुनावणी होण्यासाठी कोणत्याही बाबी रेकॉर्डवर ठेवण्यात आलेल्या नाहीत," असे न्यायाधीशांनी सांगितले. 
काही वार्तांवर आधारित अस्पष्ट आणि भाकड निवेदन करणारी उत्साहहीन अशी ही याचिका आहे. मोदी यांनी मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचे राय यांचे म्हणणे होते.

Web Title: HC rejects petition challenging Modi's election from Varanasi