esakal | सत्ता गेल्यानंतर आता कुमारस्वामी घेणार संन्यास?
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ता गेल्यानंतर आता कुमारस्वामी घेणार संन्यास?

- मला जनतेच्या हृदयात जागा हवी.

- मी आता राजकारणातून दूर जाण्याचा विचार सुरु केलाय

- राजकारण जातीयवादी आहे.

सत्ता गेल्यानंतर आता कुमारस्वामी घेणार संन्यास?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळुरु : मला जनतेच्या हृदयात जागा हवी आहे. माझे ठरलंय मला राजकारणात राहायचे नाही. मी आता राजकारणातून दूर जाण्याचा विचार सुरु केला आहे, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले.

राज्यात भाजपने 'ऑपरेशन लोटस' सुरु केले होते. त्यानुसार कुमारस्वामी यांचे सरकार पाडले. त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर आले असून, बी. एस. येडियुरप्पा यांना मुुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली. या राजकीय घडामोडीनंतर आता कुमारस्वामी यांनी राजकारणातून अलिप्त राहण्याचा विचार सुरु केला आहे.

याबाबत कुमारस्वामी म्हणाले, राजकारण आणि मुख्यमंत्रिपदावरही मी अपघातानेच आलो होतो. देवाने मला दोनदा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. मी तिथे कोणाला खूश करण्यासाठी बसलो नव्हतो. राज्याच्या विकासासाठी मी मागील 14 महिने चांगले काम केले. मी समाधानी आहे. आजचे राजकारण कोणत्या थराला, दिशेला जात आहे हे पाहिले आहे. राजकारण हे क्षेत्र चांगल्या लोकांसाठी नाही.

तसेच राजकारण जातीयवादी आहे. मी ठरवले आहे. मला शांततेत जगायचे आहे. राजकारण माझ्या कुटुंबाला नकोसे झाले आहे, असेही ते म्हणाले.

loading image