अखेरच्या दिवशी 'तो' ऑफिसला गेला घोड्यावर

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

बंगळूरू : रोजच्या कंटाळवाण्या कामाला रामराम ठोकून ऑफिसचा शेवटचा दिवस अविस्मरणीय करण्याचा अनेकांचा मानस असतो मात्र तो पूर्ण होतोच असे नाही. बंगळूरमधील रुपेश वर्मा या तरुणाने मात्र कामाच्या शेवटच्या दिवशी घरापासून ऑफिसपर्यंत चक्क घोड्यावर प्रवास केला. 

बंगळूरूमधील प्रचंड ट्रॅफिकचा निषेध करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या रुपेश वर्माने बंगळूरूच्या रस्त्यांवर घोड्यावर प्रवास केला. इतर लोकांनी आपल्या या कृतीतून चुकीचा संदेश घेऊ नये म्हणून त्याने घोड्यावर "सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाचा शेवटचा दिवस" असा फलक लावला होता. 

रुपेशच्या या आगळ्यावेगळ्या कृतीने बंगळूरूच्या रस्त्यांवरील लोकांचे लक्ष वेधून घेतले, तर अनेक लोकांनी त्याचे व्हिडिओ काढत ते सर्वत्र व्हायरल केले. यामुळे रुपेश वर्माला एका रात्रीत इंटरनेटवर प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 

सूत्रांनुसार, रुपेश वर्मा गेल्या आठ वर्षांपासून बंगळूरूमध्ये वास्तव्यास असून तेथील ट्रॅफिक आणि छोट्या रोडमुळे वैतागला होता. त्यामुळे ऑफिसच्या शेवटच्या दिवशी त्याने मथिकेरे येथील आपल्या घरापासून भाड्याने घोडा घेऊन ऑफिसपर्यंतचा 16.8 किमीचा प्रवास केला. सकाळी सात वाजता घोड्यावर सुरु केलेला प्रवास दुपारी दोन वाजता संपला. गाडीवर याच प्रवासाला 40 ते 50 मि. लागतात, घोड्यावर मात्र हा प्रवास तब्बल सात तासांपर्यंत लांबला. 

सूत्रांनुसार, रुपेश वर्मा मागील बऱ्याच दिवसांपासून घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत होता. यावरुन बंगळूरमधील ट्रॅफिकचा प्रश्न किती गंभीर आहे हे लक्षात येते.  

Web Title: he goes to the office on horse on last day