भारतीय जवान मोहम्मद यासीन सुरक्षित, संरक्षण मंत्रालय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मार्च 2019

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने केलेला एअरस्ट्राईक आणि त्यानंतर जम्मू बस स्थानकावर झालेला ग्रेनेड हल्ला यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांच्या अपहरणचे वत्त व्हायरल झाले होते. परंतु, हे वृत्त खोटे असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नुकतीच अभिनंदन यांची सूटका करण्यात आल्यानंतर आणखी एका जवानाचे अपहरण झाल्याची बातमी आल्याने एकच खळबळ उडाली होती. तसेच यासीन सुरक्षित असल्याचेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. 

काही प्रसारमाध्यमांमध्ये लष्कर जवान मोहम्मद यासीन यांचे बडगाम येथून अपहरण झाल्याचे हे वृत्त दाखविण्यात येत होते. परंतु, हे वृत्त खोटे असल्याचे सांगत, याबाबत कोणतेही अंदाज व्यक्त केले जाऊ नयेत असे आवाहनही संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

जवान मोहम्मद यासीन हे भारतीय लष्करातील जाकली युनिटचे सदस्य आहेत. बडगाम जिल्ह्यातील क्वाझिपोरा चाडुरा गावचे ते रहिवासी आहेत. शुक्रवारी काही दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि ते यासीन यांना आपल्यासोबत घेऊन गेले, अशी तक्रार या जवानाच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केली होती. अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ शोध पथके रवाना करण्यात आली होती. मात्र संरक्षण मंत्रालयाने अपहरणाचे वृत्त फेटाळले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'He is Safe': Defence Ministry Says Reports of Soldier's Abduction by Militants in J&K's Budgam 'Incorrect'